समाजसेविका अश्विनी पाचारणे यांनी तिन्हेवाडी-राजगुरुनगर रस्त्यावरील खड्डे यांच्या स्वखर्चातून बुजवले*
*समाजसेविका अश्विनी पाचारणे यांनी तिन्हेवाडी-राजगुरुनगर रस्त्यावरील खड्डे यांच्या स्वखर्चातून बुजवले* पुणे स्नेहा उत्तम मडावी तिन्हेवाडी-राजगुरुनगर मार्ग हा नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा मुख्य रस्ता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अनेक अपघातांच्या घटना घडण्याची शक्यता वाढली होती. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष न गेल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. या परिस्थितीची जाणीव होऊन राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा सौ. अश्विनी राजेंद्र पाचारणे यांनी पुढाकार घेतला. नागरिकांना होणारा त्रास ओळखून त्यांनी स्वखर्चातून रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम करून घेतले. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना आता सुखद व सुरक्षित प्रवासाचा दिलासा मिळाला आहे. याबाबत बोलताना सौ. अश्विनी पाचारणे म्हणाल्या, “विकासाची खरी सुरुवात स्वतःच्या गावापासून होत असते. गावासाठी आणि नागरिकांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी समा...